1 तवय त्या लोकसमुदायले दखीन येशु डोंगरवर चढी गया, अनं तो बसना तवय त्याना शिष्य त्यानाजोडे वनात. 2 मंग तो त्यासले शिकाडु लागना.
3 “ज्या मनतीन गरीब त्या धन्य; कारण स्वर्गना राज्य त्यासनं शे!” 4 ज्या शोक करतस त्या धन्य; कारण त्यासले सांत्वन भेटी. 5 ज्या नम्र त्या धन्य, कारण त्या पृथ्वीना वारसदार व्हतीन. 6 ज्या धार्मीकतेना भूक्या-तिशा त्या धन्य, कारण त्या तृप्त व्हतीन. 7 ज्या दयाळु त्या धन्य, कारण त्यासनावर दया व्हई. 8 ज्या मनना शुध्द त्या धन्य कारण त्या देवले दखतीन. 9 ज्या शांती निर्माण करनारा त्या धन्य, कारण त्यासले देवना पोऱ्या म्हणतीन. 10 [~1~]धार्मीकतामुये ज्यासना छळ व्हयेल शे, त्या धन्य, कारण स्वर्गनं राज्य त्यासनं शे. 11 [~2~]मनामुये जवय लोक तुमनी निंदा अनं छळ करतीन, अनी तुमना विरूध्द सर्वा प्रकारन्या वाईट लबाडीमा बोलतीन तवय तुम्हीन धन्य. 12 [~3~]आनंद करा, उल्लास करा, कारण स्वर्गमा तुमनं प्रतिफळ मोठं शे; कारण तुमना पहिले ज्या संदेष्टा व्हई गयात त्यासना त्यासनी तसाच छळ करा.
13 [~4~]तुम्हीन पृथ्वीना मीठ शेतस; पण जर मीठना खारटपणाच निंघी गया तर तो खारटपणा त्याले कशाघाई आणता ई? ते काय कामनं ऱ्हावाव नही, तर ते फेकाई जाई अनी लोकसना पायखाल चेंदाई जाई. 14 [~5~]तुम्हीन जगना प्रकाश शेतस; डोंगरवरलं शहर लपु शकस नही. 15 [~6~]दिवा लाईसन चंपानाखाल ठेवतस नही, दिवठणीवर ठेवतस म्हणजे तो घरमधला सर्वासले प्रकाश देस. 16 [~7~]तसच तुमना प्रकाश लोकससमोर असा पडू द्या की, त्यासनी तुमना सत्कर्म दखीसन तुमना स्वर्गमधला बापनं गौरव कराले पाहिजे.
17 अस नका समजा की, मी नियमशास्त्र अनं संदेष्टासना ग्रंथ नष्ट कराले येल शे; मी तर ते पुरं कराले येल शे. 18 [~8~]कारण मी तुमले सत्य सांगस की, जोपावत आकाश अनं पृथ्वी नष्ट व्हस नही तोपावत सर्वकाही पुरं व्हवाशिवाय नियमशास्त्रमधला एक बी कानामात्रा नष्ट व्हवावू नही. 19 यामुये जो कोणी यामधली धाकलीत-धाकली एखादी आज्ञा नष्ट करीसन लोकसले शिकाडी त्याले स्वर्गना राज्यमा सर्वात धाकला म्हणतीन, पण तो जर सर्वा आज्ञा पाळी अनं लोकसले शिकाडी त्याले स्वर्गना राज्यमा सर्वात मोठा म्हणतीन. 20 मी तुमले सांगस, शास्त्री अनं परूशी ह्यासपेक्षा तुमना नम्रपणा अधिक व्हवाशिवाय स्वर्गना राज्यमा तुमना प्रवेश व्हनारच नही.
21 खून करू नको अनं जो कोणी खून करी तो न्यायालयमा दंडकरता पात्र व्हई, हाई पुर्वजसनी सांगेल व्हतं, हाई तुम्हीन ऐकेल शे. 22 मी तर तुमले सांगस, जो आपला भाऊवर बिनकामना संताप करी तो न्यायालयना शिक्षाना पात्र व्हई, जो कोणी आपला भाऊले, अरे येडा असं म्हनी तो उच्च न्यायालयना शिक्षाले पात्र व्हई; अनी जो कोणी त्याले, “अरे मुर्खा” असं म्हनी तो अग्नीनरकना शिक्षाले पात्र व्हई. 23 यामुये जर तु देवले अर्पण कराले वेदीवर काही भेट लयना अनी तवय तुले आठवण व्हयनी की, मना भाऊले मनाबद्दल काही राग शे. 24 तर आपली भेट वेदीना समोर सोडीसन पहिले आपला भाऊसंगे तडजोड कर, अनी मंग ईसन आपलं दान अर्पण कर. 25 वाटवर तुना शत्रु तुनाबरोबर शे, तवय त्यानासंगे तडजोड कर, नही तर तो तुले न्यायाधिशना हातमा दि, न्यायाधिश तुले शिपाईसना हातमा दि, अनी शिपाई तुले कैदखानामा टाकतीन. 26 मी तुले खरंखरं सांगस, जोपावत दमडीन दमडी फेडापावत तठेन तुनी सुटका व्हवाव नही.
27 व्यभिचार करू नको, हाई जे सांगेल व्हतं, ते तुम्हीन ऐकेल शे. 28 मी तुमले सांगस, जो कोणी बाईकडे वाईट ईचारतीन दखस तवय त्यानी आपला मनमा तिनाबद्दल व्यभिचार करेलच शे. 29 [~9~]जर तुना उजवा डोया तुले पाप कराले लावस, तर तु त्याले काढीसन फेकी दे! कारण तुनं पुरं शरीर नरकमा जावापेक्षा एक अवयवना नाश व्हवाले पाहिजे, हाई तुनाकरता जास्त चांगलं शे. 30 [~10~]तुना उजवा हात तुले पाप कराले लावस तर, तु त्याले कापी टाक! कारण तुनं पुरं शरीर नरकमा जावापेक्षा, तुना एक अवयवना नाश व्हई, हाई तुनाकरता जास्त चांगलं शे.
31 [~11~]जो कोणी बायकोले सुटपत्र देवाले दखसं त्यानी तिले सुटपत्र देवाले पाहिजे, हाई बी सांगेल व्हतं.[~12~] 32 [~13~]मी तर तुमले सांगस, जो कोणी आपली बायकोले व्यभिचारना कारणतीन सोडस तर तो तीले व्यभिचारीनी बनाडस; अनी जो कोणी अशी सोडेल बाईसंगे लगीन करस तो बी व्यभिचार करस.
33 “खोटी शपथ लेवु नको” तर “आपली शपथ देवनापुढे खरी कर” असं पुर्वजसले सांगेल व्हत, हाई तुम्हीन ऐकेल शे. 34 [~14~]मी तुमले सागंस, शप्पथ वाहू नका; अनी स्वर्गनी पण शप्पथ वाहू नका. कारण ते देवना राजासन शे. 35 पृथ्वीनी पण शप्पथ वाहू नका, कारण ती देवनी पाय ठेवानी जागा शे अनी यरूशलेमनी पण शप्पथ वाहू नका, कारण ती “थोर राजानी नगरी शे.” 36 आपला डोकानी पण शपथ वाहू नको, कारण तु डोकाना एक बी केस पांढरा अनं काया करू शकस नही. 37 तुमले “हो” म्हणनं व्हई “हो” म्हणा, “नही” म्हणनं व्हई तर “नही” ऐवढच ऱ्हावाले पाहिजे; यातीन जे काही जास्त ते वाईट पाईन शे.
38 “तुम्हीन हाई ऐकेल शे की, ‘डोयना बदलामा डोया’ अनं दातना बदलामा दात.” 39 मी तर तुमले सांगस वाईट माणुसले अडावुच नका, कारण जो कोणी तुमना एक गालवर मारस, तर दुसरा गाल बी त्यानाकडे करा. 40 जो कोणी जबरदस्तीतीन तुना गंजीफराक लेवाले दखस, त्याले तुना बाहेरना कपडा बी लेऊ दे; 41 जो कोणी तुले जबरदस्तीतीन एक कोस लई जाई, त्यानासंगे तु दोन कोस जाय. 42 जो तुनाकडे काही मांगस त्याले दे, अनी जो तुनाकडे उसनं मांगाले दखस त्यानापाईन पाठ फिरावु नको.
43 आपला शेजारीसवर प्रिती कर, अनं शत्रुसना व्देष कर, अस सांगेल व्हतं, ते तुम्हीन ऐकेल शे. 44 मी तर तुमले सांगस आपला शत्रुवर प्रिती करा, अनं ज्या तुमना छळ करतस त्यासनासाठे प्रार्थना करा. 45 ते यानाकरता की तुम्हीन स्वर्गना पिताना पुत्र व्हवाले पाहिजे, कारण तो चांगलासवर अनं वाईटसवर पन आपला सुर्य उगाडस अनी धार्मीक अनं अधार्मिक मानससवर बी पाऊस पाडस. 46 ज्या तुमनावर प्रिती करतस, त्यासनावर तुम्हीन प्रिती करी तर तुमले काय प्रतीफळ मिळी, कारण जकातदार बी तसच करतस ना? 47 जवय तुम्हीन आपला बंधुसले नमस्कार करतस पण त्यामा काय विशेष? कारण गैरयहूदी पण तसच करतस ना? 48 जशा तुमना स्वर्गीय पिता परीपुर्ण शे, “तस तुम्हीन पण पुर्ण व्हा.”
<- मत्तय 4मत्तय 6 ->✡5:10 ५:१० १ पेत्र ३:१४
✡5:11 ५:११ १ पेत्र ४:१४
✡5:12 ५:१२ प्रेषित ७:५२
✡5:13 ५:१३ मार्क ९:५०; लूक १४:३४,३५
✡5:14 ५:१४ योहान ८:१२; ९:५
✡5:15 ५:१५ मार्क ४:२१; लूक ८:१६; ११:३३
✡5:16 ५:१६ १ पेत्र २:१२
✡5:18 ५:१८ लूक १६:१७
✡5:29 ५:२९ मत्तय १८:९; मार्क ९:४७
✡5:30 ५:३० मत्तय १८:८; मार्क ९:४३
✡5:31 ५:३१ मत्तय १९:७; मार्क १०:४
✡5:31 ५:३१ २४:१-१४
✡5:32 ५:३२ मत्तय १९:९; मार्क १०:११,१२; लूक १६:१८; १ करिंथ ७:१०,११
✡5:34 ५:३४ याकोब ५:१२; मत्तय २३:२२